Skip to main content

पुन्हा शोधु चला ते बालपन

हेलो  मित्र ,मैत्रीनींनो , किलबिल फुलपाखरांनो :) कसे आहात . .? आनी कुठे बागडताय  . ? 

  . . .काय झाल .. नवल वाटले .? किलबिल फुलपाखर म्हनल्याने . ? आनी बागडतात तर लहान मुले . .? होय ना ? 

              अगदी खरे :) त्याच किलबिल फुलपाखरांप्रमाने स्वच्छंद दुनियेत आपल्याला आज जायचय . म्हनजेच आपल्या बालपनात . डायरेक्ट टाइम मशिन नेच . . . चला मग . ,

            काय झाले का थामलात .? विचारात पडला टाइम मशिन ऐकल्यावर .? कारन ते तर पुस्तकात ,वा फिल्म मधेच असते ना . ? मग कसे जानार यार आपन . ? 

             डोंट वरी , चिल . . चिल  . . . .टाईम मशिन शिवाय ही  येते जाता , मि आले आहे जाऊन जस्ट आत्ताच . . हो अगदी खरे . . .  

                  . . पन कसे .  . ऐकायच . ?

 या मग जाऊत सर्वजन आपल्या आपल्या  बालपनात .   

      आज  बालपनाची एक मैत्रीन भेटली . "रुपा" आनी माझा आनंद गगनात मावेनासा झाला , एवढी खुष झाली , कारन अगदी बालपनातच गेल्यासारख वाटल . आनी त्या बालपनाच्या रम्य आठवनींत मन हरऊन गेले . अगदी फ्लैश back  च .

बालपन  :)  :- बालपन म्हनजे इक निरागस असा  फुलपाखरा प्रमाने स्वच्छंद प्रवास असतो .
… … …… … …  … … … … … … … … … … … 

बालपन म्हनजे तरी काय असत .? " "मनसोक्त होनारा , दिलखुलासपने जगला जानारा"  इक रम्य प्रवास . !

बालपन म्हनल की,
 आठवते ति लिमलेट ची गोळी ,
     आनि सुसाट धावनारी ,
 ति चड्डी- बड्डी दोस्तांची टोळी
बालपन म्हनजे वारया ची मोकळी झुळूक ,
     त्या कच्च्या कैरया आनी ते चिंचेचे बुटूक . 
बालपनाची ती होळीची मजा ,
 आनी मकरसंक्रांतीचा लाडू .
            बनवलेला तो मातीचा किल्ला
                आनी खेललेला तो विटी दांडु 
बालपन म्हनजे तरी काय असत .? 
ना असते  कुनाची पर्वा ,
      ना असते कुनाची भिती.
मिच आपल्या मनाचा राजा 
    आनी मिच आपल्या मनाची रानी . 

… … … … … … … … … … … … … …  … … …   … … … …
             बालपनात हे इक अल्लड कोवळे वय . 
        कारन त्या वयात ना कसले टेंशन असते ,ना डोक्यात कुठल्या विचारांचा मारा . म्हनुन बालपन हे अतिशय मोकळे आनी आनंदी असते .

प्रत्येकाच्या आयुष्यात आपआपल्या बालपना च्या आठवनी या मनाशी असतातच , आनी , आपल्याला असे कित्येकदा वाटत असते कि , "काश ! ते बालपन जर पुन्हा जगता आल " तर ! 

असे आपल्याला वाटत  . याच कारन हेच कि बालपनाचे दिवस हे अतिशय सुखद असे असतात .  तेव्हा आपन जग अनुभवल नसत आनी म्हनुन कसली चिंता  आपल्याला नसते . 

 बघा ना थोडासा विचार करुन ..आपल्या बालपनाच्या जगन्यात आनी आत्ताच्या जिवन जगन्यात काय बदल आहे 

     आपन बालपनात विना चिंता जगत असतो आनी छोटया छोटया गोष्टीमधे आनंद शोधत असतो .
भातुकली च्या खेळ

पासुन तर झाडावर चिंचा - कैर्या तोडन्यापर्यंत चे  विविध एडवेनचर हे आपल बालपन  प्रत्येकास शिकवत असत .आनी तेव्हा जो आनंद भेटतो ना त्यात ,तो अगदी जग जींकन्या ईतका मौल्यवान असतो .  लहानपनी आपन अनेक खेळ खेळलोत.    त्यापैकी  विटी दांडू झाल ,डब्बा एक्स प्रेस ,नवरा - नवरी ,घर -घर ,भातुकली किव्वा पकडा - पकडी यासारखे असंख्य . पन त्याचबरोबर सर्वाना लक्षात असेलच 

आपन लहानपनी बनवलेली 

ति " कागदाची नाव "  

नक्किच प्रत्येकानी बनवलेली असेल , आनी त्या नावेसोबत मनसोक्त खेळही खेळला असेल.जेव्हा ति नाव आपन पान्यात सोडायचो तेव्हा कमालीचि मज्जा यायची ना . ? जनु खरोखरची नाव बघतोय ,कीवा नावेसोबत आपन पन बसुन जातोय . अश्या निरागस बाल कल्पना तेव्हा मनात येत असाव्यात.

नावांसोबत तर मिही भरपुर         खेळले आहे . त्या पावसाच्या पान्यात छोटया छोटया नावा बनऊन सोडायच्या आनी कुतुहुलानी बघायच त्या कूठवर जातात .  त्यातली ति मज्जाच निराळी होती 
 आनी पाऊस नाही आला तर अगदी घरातल्या घमेल्यात पन नाव बनऊन सोडल्यात 

तुम्हीही सोडल्या असतील  . घराच्या टाकित , भांडयात . 
      आता  ति पावसाचि मजा जनु हरवलीच आनी आपली ती नाव जनु बालपनात दुरवर वाहत गेली म्हनुतर दिसेनाशी झाली आजकाल . कारन आजकाल नाव बनवनारे बाल कलाकार मोबाईल चे गेम्स खेळन्यात बिजी झालेत . म्हनुन त्या आपल्या बालपनातल्या आठवनी जगताना हल्ली कूनी लहानगे ही दिसेनासे झालेत . 
बालपनाच्या ते दिवस नुसते डोळयासमोर जरी आले तरी ते मनाला आनंद देऊन जातात. 
         बघा ना आता नुसती आठवन काढल्यावर नक्कीच सर्वांना आपल्या पाऊस आनी नाव याच्या आठवनी मनात आल्या असतीलच .

नावेप्रमाने बालपनी आपन अश्या अनेक गोष्टीमधुन आनंद जगत असतो . छोटया छोटया गोष्टीतुन मोठा आनंद जगतो .
जसे बालपनी गोळया,चोकलेट . लोलीपोप मिळल्यावर आपला तो भरमसाठ आनंद 

आनी ती आपल्या डोळयांवर

आलेली ती कमालीची चमक
आनी तो खुललेला चेहरा .  . आठवला ना . ? ;) 


   हिच ति मजा ,हाच तो छोटया छोटया गोष्टी मधुन शोधलेला तो मोठा आनंद . जो आपन आजकाल विसरत चाललो आहोत . 

      मान्य आहे मोठेपनी जवाबदारी येतात .लहान मोठया चिंता येतात . पन यामधुनही इक सुकाची झुळूक शोधने ,( स्पेस, आहे त्यात सुख शोधने - समाधान शोधने ) म्हनजेच आपल्या बालपनासारखे छोटया गोष्टी मधे शोधलेला आनंद जगने होय . 

बालपनी आपन आपल्या मनाचे राजे असतो . जो तो स्वताला मि कूनीतरी भारी आहे असे वाटत असते . आपन पाहत असलेल्या कारटून मधल्या भीम प्रमाने आपन लहानपनी निरनिराळया अश्या वेषभुशा करुन खेळ खेळलो असेल ,बागडलो असेल  किवा सुपर मेन पाहुन आपल्यातही तशी पावर आहे हे दुसर्याला भासऊन विविध प्रतापही केले असेल

यातन सांगायच हेच की आपनी बालपनी स्वताला काहीका समजेना टी व्ही पाहुन . पन आपन ते  कैरेक्टर आपल्यात पुरेपुर  ऊतरावचो . 
       अत्ता पाहायच झाल तर अनेकांचा स्वतावर विश्वासच नसतो . हे मि करू शकेन का नाही असे बहुतेकांना वाटून ते प्रयत्न करन्या आधी च हार मानतात . स्वताला इक चान्स तरी देऊन बघाव जसा बालपनी देत होतो . 

बालपनि नीदान आपल्या त्या निरागस स्वप्नात का होईना पन आपन ते आहोतच असे समजुन का होईना पन तो रोल आपन पुरेपुर जगत होतो.     तो म्हनजेच , " मि हे नक्किच करु शकेल ", आशी भावना असलेला आपला स्वतावरचा असलेला विश्वास होता . हाच विश्वास मोठेपनी कमी होतो . काहिंमधे तर अगदी नष्टच होतो.
                 ते काही जन आपली स्वप्न पुर्न करताना जर अपयश आल तर खचुन जाऊन आपन प्रयत्न सोडततात  किवा आत्मविश्वासच हरऊन बसतात
मात्र याऊलट लहानपनी असते :)  
        कारन , लहानपनी कूनाचा बोलन्याचा  आपल्यावर परीमाम होत नाही ना खुप मनावर कूनाच्या टोमन्याने आघात होतो . अगदि मातिचा किल्ला बनवन्यात जरी अपयश आल तरी लहान मुल परत त्याच ऊम्मेदीनी पुन्हा तो किल्ला बनवतात . हे मि बघितलेल जिवंत ऊदाहरन आहे . 
जर असाच आत्मविश्वास  मोठेपनीही आपन स्वतावर ठेवला तर  गड जींकुत आपन . . अर्थातच आपली स्वप्ने नक्किच पुर्न करु शकू . तेही विना कसली चिता केल्या शिवाय  ., तेही अगदी आपल्या बालपनासारख रम्य आयुष्य  जगत जगत . फक्त गरज आहे ति स्वताला तशी सवय लावन्याची . 
आपल्या या बालपनातुन आपल्याला घेन्यासारख्या खुप गोष्टी आहेत . ज्या आपन आजही जोपासल्या तर आपल्या या धकाधकी च्या जिवनातही आनी  आपल्या कामासोबतही स्वतासाठी आनंदी जिवन जगु शकतो .

 सर्वांना बिझि  जिवनात आपले भावि आयुष्य ऊत्तम करन्यासाठीची  झगड आनी त्यासाठीची धडपड ,जुगाड , याचीच चिंता पडलेली असते. जो तो पैसा कमवन्यासाठी दिवस रात्र इक करत  धडपड असतो . मग कालांतराने   आपन आपल्या आयुष्यात सेटल जरी झालो तरी आपली चिंता संपत नाही . त्यानंतरही आपल्याला अधीकाधिक कस सेविंग करता येईल याचि चिंता आपल्याला पडते . या पुढ जान्याच्या आनी जास्तित जास्त पैसा कमवन्याच्या शर्यतीत आपन निवांतपनाचा इक दिवसही जगत नाही . जस लहानपनी जगायचो 

हो पैसा ही अत्यंत महत्वाची गरज आहे . भविष्याचा विचार ही करायलाच हवा , मात्र या शर्यतीत ईतकही वेगाने धाऊ नये . कि स्वताहाला विसरुत . भविष्याची साठवन करताना रोजचा दिवस आनंदानी जगता यायला हवा . बालपना सारखा . 
            जिवनात चिंता ही तर  प्रत्येक व्यक्तीला असते . कूनाला मुलांची तर कुनाला घराची , कुनाला छोटी तर कुनाला मोठी . पन मग आपन या चिंतेला इतक मनावर घेतो कि त्यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट आपल्याला महत्वाची वाटत नाही   
             याने होत काय . .कि आपन जिवनातल्या छोटया- मोठ्या गोष्टीतुन भेटनार्या आनंदाला मुकतो . दुसर काही नाही. 
    आपल्याला आपल्या कामातुन पन आपल आयुष्य आपल्या बालपना सारख निवांत जगता आल पाहीजे . आनी आपन जगुही
शकतो . . काय अवघड आहे त्यात . ?  
   आपल्याला बालपनी टेंशन नव्हते , 
       आत्ता आहेत बरोबर . ? तर आपन आपले टेंशन साईड ला ठेऊनही आयुष्य निवांत जगु शकतो ना . .  . . . ? 
          ,  कारन निम्मे टेंशन - चिंता आपल्याला भविष्याच्या असतात . किवा भुतकालातल्या गोष्टी चा तान . आपन वर्तमान का नाही जगत भरभरुन ?
       कारन जर आपली चिंता भविष्यातली आहे तर आपल्याला त्याच ऊत्तर सुध्धा भविष्यातच मिळनार ना . ? कारन आपन कुनी अंतरयामी आत्मा तर नाही आहोत जो भविष्यातल्या चिंता
ह्या फक्त विचार करुन संपऊन टाकुत किव्वा  आधीच गायब करुत . . ? नाही ना . ? मग . . !   

     ज्या दिवशी आपन वर्तमान ( आपला आजचा दिवस ) हा पुर्नपने जगायला शिकलो ना त्या दिवशी पासुन आपल्याला आपल्या बालपना तला तो आनंद पुन्हा भेटु लागेल .  

           कारन जे लोक  पुढच्या चिंता ना अती महत्व देन्यापेक्षा फ्क्त रोजचा दिवस आनंदात घालवन्याला महत्व देतात . त्या लोकांच आयुष्य खुप सोप होत . आनी ते भविष्यात चिंता शिवाय अधिक चांगल प्लानिंग करु शकतात. कारन सर्व प्रश्न हे शांत डोक्याने सुटतात . त्यासाठी आधी स्वतहा खुष असायला हव . लहान मुलांप्रमाने स्वच्छंदपने  जगायला हव  तरचच आपन दुसर्याना खुष ठेऊ शकतात . आनी भविष्यातले अवघड वाटनारे प्रश्न सोपे करु शकु.








" That is true fact " .

भविष्याचि नुसतिच चिंता करुन भविष्य ऊज्वल नाही होत , त्यासाठी प्रयत्नाची जोड इकदम घटट असावी लागते .  

म्हनुनच आपन भविष्याची चिंता करन्यापेक्षा ,आनी झालेल्या गोष्टी चा तान करन्यापेक्षा जर पुढच्या होनार्या गोष्टी साठी फ़क्त आटोकाट . जिद्दीने प्रयत्न केले . तर यश हे भेटनारच . 
          पन खुप कामात आहे . मला माजी भविष्याची चिन्ता आहे असे बहाने करत एन आपन रोजचा दिवस बोरिंग बनऊन संपवतो .
 त्यापेक्षा जर रोज एखादे तरी आपल आवडीच काम केल पाहीजे ज्याने आपल्याला खुशी मिळल. याने आपन रिलेक्स फिल करूत. कीव्वा
आपला एखादा छंद जोपासला पाहीजे . 
छंद हा प्रत्येकाला असतोचच . कुनाला चित्रकलेचा छंद तर कुनाला संगीत, कुनाला डान्स तर कुनाला पाककलेचाही छंद असु शकतो 
        याच आवडीप्रमाने आपन इकदा तरी दिवसातुन ,किमान आठवडयातुन तरी यासारख्या आपल्या आवडीच्या कलेला वाव दिला ना . तर आपन मनानी नेहमी हुश त अगहुत .
अगदी बालपनी होतो तसेच . कारन लहान मुल कसे मनाप्रमाने गोष्टी करतात .आनी जशी त्यातुन त्यांना जशी खुशी मिळते तशी आपल्या ला ही मिळते .
आपल्या आवडीच्या गोष्टी करन्याने आपन मोकळ राहतो . तान कमी होतो . 

आनी आपन नेहमी आनंदी राहु शकतो . बालपनासारख .  हो हे अगदी खरे आहे मित्रहो .     

 मिही तसेच करते , मि माझे छंद आजकाल खुप जपायला लागले . कारन मला अनुभव आहे . आगोदर मि टेन्शन मधे  खुप माझ्या आवडिंनकडे दुर्लक्ष केले . तेव्हा मि अनुभवल आहे छोट टेंशन सुद्धा आपल्या ला खुप महत्वाच वाटु लागत जेव्हा आपन त्या चिंता ना अधीक महत्व देतो . That's very true . 
       म्हनुन त्या दिवसांपासुन मि टेंशन असो वा बिजी असो . माझे आवडीच छंद मि जोपासत आले .  जसे की, 
मला गिटार आवडते , मला चित्रकला आवडते .  आठवद्यातून इक चित्र तरी काढते मि . त्यातन मला आनंद भेटतो . मि बोर झाले की माझे आवडीचे गानी ऐकते . 
         ऊदास असल्यावर , रिलेक्स होन्यासाठीही मी गानी ऐकते . पन मात्र  हैपी वाली  . त्याने माझा मुड लगेच चांगला होतो . माझाच नाही तर सर्वांचाच होऊ शकतो ,कारन आता हे सायन्टिफिकली ही प्रुफ झाल आहे हे म्यूजिक ने मन शान्त होते .तान- तनावातुन रिलैक्स वाटते.                
           तसेही  मला आधीपासनच म्यूजिक हे जाम  आवडत. माझि दिवसाची सुरुवातच म्यूजिक ने होते .म्हनुन मला हे माहीत आहे.  त्यानंतर मला आर्टीकल लिहायला आवडत , मि एवढयातच  न्यूट्रीशन चा डीप्लोमा केला आनी त्याच स्वताला काहीतरी आऊटपुट म्हनुन मि रोज इक तरी हेल्थ टिप्स इन्सटाग्राम वर तयार करुन अपलोड करतेच . मग ति रेसीपी असो वा फिटनेस डायट. आनी प्रत्येक संडे ला इक मराठी ब्लोग लीहुन ठेवते . आनी ईतर वेळ इग्लीश ब्लोग .  पुस्तक वाचते . आनी बाकी स्टडी लाही माझा सेप्रेट टाईम आहे . असे मि टाइम टेबल नाही केल पन माझ्या आवडीला इक ठराविक वेळ दिला आहे :)
         हे काही परीक्षेची तयारी नाही किव्वा स्वताला घातलेले नियमही नाही . मला या गोष्टी मनापासुन आवडतात . आनी जस बालपनात आपन मनसोक्त जगतो ना हा ही त्यातलाच इक भाग आहे ज्यातन आपन खुश राहु मनातुन . म्हनुन मि माझ ऊदाहरन शेअर केल . 
      
      आनी  स्वताला थोडा वेळ देन्या ची ,मी सवय च लावली आहे . कारन मला दिवसाच बोरिंग रुटीन बनऊन आनी चिंता करुन . रोजचा दिवस येतो तसा ढकलत पुढ जायच नाही आहे . रोजचा दिवस भरभरुन जगायचा आहे .बालपना सारखा.  माझे छंद आवड जपायची आहे . आनी ती मी नेहमी जपेनच :) तुम्हीही जपा आपले छंद .
       याने होत काय आपन व्यस्तही राहतो . आनी आपले छंद जोपासले जातात . तान कमी होतो रिलैक्स वाटत . रोजच्या व्यापातुन थोडा
 वेळ तरी प्रत्येकानी स्वताला हा दयायलाच हवा

कारन जस मि माझ्या आवडीच्या गोष्टी मधे स्वताला बिजी ठेवते, याने मला वेळ नाही भेटत कुठल्या गोष्टी च टेंशन घेन्यासाठी . 
हे माज रुटीन आहे , 
मि माझ्या आयुष्यात आगोदर अप्लाय केल मग या ब्लोग मधि हा पोइंट एड केला. कारन  ते तुम्ही ऐकल असेल  जगाला सल्ला देन्याआधी आपल्यात तो गुन असायला हवा . मिही या गोष्टीचि  जानीवपुर्वक स्वताला सवय लावली तेव्हा माझ हे रुटीन बनल . आता मला कितीही टेंशन आल तरी जास्त फ़रक पडतच नाही . कारन मि त्याच महत्व वाढवतच नाही . मग मला मार्गही आपोआप सापडतो प्रत्येक गोष्टीतुन.  
फ्री माईंड मुळ अवघड प्रश्न सोपे होतात मि आगोदर बोलली हे वर.

आनी या रुटीन मुळ जवळपास 

मि माझ्या आयुष्यातल्या 70% चिंता दुरच केल्या कारन वेळच नाही 
चिंताचा विचार करायला  आनी जास्तीचा तान घेन मी विसरलेच जनु . आनी जरी टाईम भेटला तरी मि तो चांगल्या गोष्टी साठी वापरते . विचार चांगल आरटीकल लिहीन्यासाठी करावा. एखादी कविता करन्यासाठी करावा . रोजचा दिवस आनंदी नक्किच होऊ शकतो . अगदी बालपना सारखा . आनी महत्वाच  सुखाची झोपही भेटेल. 
  कारन स्वताला चेंज केल तर झोपताना ऊद्याचे विचार तनाव कमि आनी दिवभरात झालेल्या मनमर्जिच्या घडामोडीच समाधान असेल मनात . तर झोप तर छान येनारच . अगदि बालपनासारखी घटट . असे सोपे आयुष्य सोपे करुन जगने आनी मनसोक्त जगने हीच बालपनाचि खरी ओळख आहे . 
म्हनुनच " बालपन पुन्हा दे देवा "किव्वा 'बालपनात जर टाईम मशीन ने जाता आल तर 
 तर .? अशे तर्क करन्यापेक्षा बालपनच पुन्हा आपल्यात आना मनसोक्त जगुन . छोटया मुलांसारख स्वतावर विश्वास ठेऊन . चिंताना दुर ठेऊन मोकळ जिवन जगुन ते बालपन पुन्हा जगुत . 


     आनी टाईम मशीन ची गरज बालपनात जान्यासाठी तर नक्किच नाही आहे ;) हे तर पाहील आपन . नुसता बालपनाचा विषय काढला तर पन्नास आठवनी डोळयासमोर जाग्या 
झाल्या ,आनी बालपनाच्या आठवनींबद्दल
बोलताना प्रत्येकजन आपल्या बालपनात गेले च असतील . आप आपल्या बालपनी च्या आठवनी आठवत .  मग यासाठी कुठल टाईम  मशीन ची गरज नाही . टाईम मशीन तर फक्त जुन्या टाईम मधे घेऊन जाऊ शकत पन आपन तो जुना टाईम ते बालपन नव्याने रोज जगु शकतो . आपली ही पावर टाईम मशीनहुन ही कमालीची आहे . 
Just Imagine and apply . 


चला तर मग बालपनी केलेल्या नावेप्रमाने बालपनातला तो रम्य प्रवास सोबत घेऊन चालुत. आनी तो दिलखुलास आनंद जिवनात ऊतरऊ .आनी जगने सोपे करुत . आनी पुन्हा जगुत आपले बालपन कायम . म्हतारे होऊस्तर
.             चिंता , टेंशना ना करा गुडबाय , 
बालपनातल्या ते निरागस मनाला करा वेलकम . म्हनजे आयुष्य सोपे करन्याची सवय लागेल आनी अवघड प्रश्न सोपे  वाटतिल . 
 बालपनावर बोलु तितके कमीच आहे. माझ मन तर नाही भरल एवढ सगळ बोलुन पन . अजुन बोलतच रहाव वाटत त्या बालपनाच्या आठवनी अजुन खुप आहेत . कदाचित अजुन एखादा ब्लोग होईल बालपनावर . विषय मात्र वेगळा असेल . 

    असेच खोलवर बालपनात गेल तर अशाच अनेक मजेदार आठवनी समोर येतिल आनी तेव्हाचे . ते किस्से बोलता बोलता blog वाढतच जाईल जसा हा वाढला :) 
चला तर मग बालपनाच्या आठवनी सोबत घेऊन जाऊत सर्व . आनी पुन्हा भेटुतच  . . 

☺☺. .  . . . . ☺☺

☺. . . . . ☺

                    . . . . . . .  ☺   . . .  . . 

स्विटू च्या स्लांमबुक मधे 📖📑

भेटू पुढच्या ब्लोग मधे . .  काळजी घ्या. 
. . बाय .बाय डियर Friends 😊
   … … … … … 
… 

Comments

  1. Waw😍 lahanpanichi ch aathvan zali blog vachun . ani kavita khup Chan cute zali sweetu ☺

    ReplyDelete

Post a Comment